Nashik News : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

Nashik News : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा माजी जिल्हाप्रमुख सुदाम कोंबडे (Sudam Kombade ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र काही वेळापूर्वीच मुंबईत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले...

Nashik News : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती
Accident News : समृध्दी महामार्गावरील अपघातातील मृतांची नावे आली समोर

मनसेचे नेते दिलीप दातीर (Dilip Datir) यांनी एप्रिल महिन्यात आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला होता. मात्र, त्यावेळेस त्यांना पक्षाकडून पदावर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु,आता दातीरांच्या जागी कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान दातीरांना लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) उतरवण्याची पक्षाची तयारी असल्यामुळे त्यांना पदमुक्त करण्यात आल्याची देखील चर्चा आहे.

Nashik News : मनसेच्या नाशिक शहराध्यक्षपदी सुदाम कोंबडे यांची नियुक्ती
Samruddhi Express Way Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना मदत केली जाहीर

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीला जोमाने सुरुवात झाली असून त्याच्याच एक भाग म्हणून ही नवीन नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे. याशिवाय लवकरच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तसेच आज झालेल्या कोंबडे यांच्या नियुक्तीवेळी मुंबईत नियुक्तीपत्र घेण्याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, नाशिक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह आदी उपस्थित होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com