उमराणे । Umrale (वार्ताहर)

उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय सदस्यपदी सहा सदस्याची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यानी केली केल्याने या प्रशासकीय मंडळावर सदस्यांची संख्या 25 झाली आहे.

करोना प्रादुर्भावामुळे बाजार समितीची निवडणूक शासनातर्फे लांबणीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे शासनाच्या पणन विभागातर्फे ऑगस्टमध्ये माजी सरपंच सोनाली विलास देवरे यांची प्रशासकीय प्रमूखपदी नियुक्ती करित एकूण 19 सदस्य नियुक्त केले होते.

त्या सदस्यांमध्ये सहा सदस्यांची वाढ करुन 25 सदस्य करण्यात आले आहे, अशी माहिती सचिव नितिन जाधव यांनी दिली आहे.

बाळासाहेब देवराम देवरे, नथा दादाजी देवरे, रतन विठोबा देवरे, मोठाभाऊ रावण देवरे, रवींद्र शंकर पवार, रविंद्र श्रावण आहेर या सहा सदस्यांची प्रशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.