वावी पोलिस ठाणे अंतर्गत दंगल नियंत्रण पथकाची नियुक्ती

वावी पोलिस ठाणे अंतर्गत दंगल नियंत्रण पथकाची नियुक्ती

वावी । Vavi

वावी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या 44 गावांत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशानुसार 25 जणांचा समावेश असलेल्या दंगल नियंत्रण पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली वावी परिसरातील गावांध्ये या पथकाचे संचलन करण्यात आले.

जिल्ह्यातील निर्बंध 2 4 मे पासून शिथिल होत असतानाच राज्यातील ब्रेक द चेनची नियमावली लागू असल्याने त्या पार्श्वभूमीवर या तुकडीची नियुक्ती करण्यात आली आहे. दंगल नियंत्रण पोलिस (आरसीपी) हे विशेषतः प्रशिक्षित पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक आहे.

हे विशेष बल व्यावसायिक मार्गाने कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे आणि दंगलसदृश परिस्थिती कुशलतेने त्याचा सामना करण्यास सक्षम आहे. कोणत्याही विद्रोहास किंवा बंडाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आरसीपीच्या प्रत्येक कंपनीकडून एका प्लॅटूनला प्रतिबंधात्मक रणनीतीचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना जलद प्रतिक्रिया पथक म्हणून विकसित केले गेले आहे.

गर्दी करून बसणारे, मास्क न वापरणारे, अनावश्यक कामासाठी बाहेर फिरणारे अशा व्यक्तीवर तुकडी कायदेशीर कारवाई करणार असून ज्या गावात जास्त रुग्ण आहेत, तेथे तुकडी कडक पहारा देणार आहे.

किराणा दुकाने, अत्यावश्यक सेवेतील आस्थापना, कृषी केंद्रे, दूध विक्री आदी यांना सोमवार (दि.24) पासून सकाळी 7 ते 12 यावेळेत नियमांचे पालन करून दुकाने उघडण्यास मुभा असून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. ज्या आस्थापना नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com