सटाणा नगरपालिका प्रशासकपदी प्रांत काकडेंची नियुक्ती

देवमामलेदारांच्या रथ मिरवणुकीस परवानगी; भाविकांमध्ये उत्साह
सटाणा नगरपालिका प्रशासकपदी प्रांत काकडेंची नियुक्ती

सटाणा । प्रतिनिधी Satana

सटाणा नगरपरिषदेतील (Satana Municipal Council) पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ उद्या दि. 29 डिसेंबर रोजी संपत असल्याने प्रशासकपदी (administrator) बागलाणचे (Baglan) उपविभागीय अधिकारी बबन काकडे (Sub-Divisional Officer Baban Kakade) यांची नियुक्ती झाली आहे.

दरम्यान नुकतीच उपविभागीय अधिकारी बबन काकडे (Sub-Divisional Officer Baban Kakade) यांनी देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या (Devmamaledar Yashwantrao Maharaj) रथ मिरवणुकीला (Chariot procession) अटी-शर्तींचे पालन करुन परवानगी दिली. योगायोगाने काही तासातच काकडे यांची सनपा प्रशासक पदावर नियुक्ती झाल्याचे शासकीय आदेश प्राप्त झाले आहेत.

बागलाणवासीयांच्या देवमामलेदार यांच्या पारंपरिक रथ मिरवणुकी संदर्भातील भावना काकडे यांनी समजावून घेतल्या व गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे (corona) बंद झालेली रथ मिरवणूक काढण्यास यंदा परवानगी दिली. प्रशासक पदावर नियुक्ती झाल्यानंतर गुरूवार दि. 30 डिसेंबर रोजी पहाटे शहरातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात पहाटे संपन्न होणार्‍या महापुजेत प्रांताधिकारी बबन काकडे (Governor Baban Kakade) व अर्चना काकडे यांना सहभागी होण्याचा मान देखील प्राप्त झाला आहे.

प्रथेनुसार महापूजेचे प्रमुख मानकरी बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे (Tehsildar Jitendra Ingle), सुप्रिया इंगळे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, अरुणा बागड यांच्या सोबत काकडे दाम्पत्याचा दैवयोगाने समावेश झाल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे देण्यात येत आहे. देवमामलेदार रथ मिरवणुकीसाठी नुकतीच प्रांताधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली.

यावेळी माजी आ. संजय चव्हाण, तहसीलदार जितेंद्र इंगळे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, पोलीस निरीक्षक सुभाष अनमूलवार, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, रमेश सोनवणे, राजेंद्र भांगडीया, छोटू सोनवणे, रत्नाकर सोनवणे, शरद शेवाळे आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. करोना संसर्गामुळे देवमामलेदार यात्रोत्सवाची परंपरा खंडित झाली असतांना किमान रथोत्सव होणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

आपल्या लोकाभिमुख कार्यामुळे शासकीय अधिकार्‍याला देवत्व प्राप्त झालेल्या बागलाण भूमीत देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या महापूजेचा बहुमान दिल्याबद्दल तालुकावासीयांचा ऋणी आहे. अधिकार्‍याचं मंदिर असणे, हा राज्य व देशासह संपूर्ण जगासाठी आगळा वेगळा आदर्श आहे.

- बबन काकडे प्रांत, बागलाण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com