मनसेना मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती

मनसेना मेळाव्यात पदाधिकारी नियुक्ती

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुका मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात (Taluka MNS workers meeting) आगामी निवडणुकांविषयी (election) पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शहर व ग्रामीणच्या नुतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.

तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांनी आगामी नगर परिषद (nagar parishad), पंचायत समिती (panchayat samiti), जिल्हा परिषद (zilha parishad) निवडणुकीत (election) उमेदवार उतरवणार असल्याचे सांगितले.

विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप केदार (Assembly Speaker Adv. Dilip Kedar) यांनी निवडणुकांसाठी लवकरच कार्यकर्त्यांच्यां मुलाखती (interviews) घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा उपाध्यक्ष अमोल जाधव यांनी पूर्व भागातील कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आवाहन केले. जिल्हा उपाध्यक्ष शैलेश येलमामे यांनी नगर परिषदेवर मनसेचा झेंडा फडकविणार असल्याचे सांगितले.

यापूर्वीही सिन्नरमध्ये (sinnar) मनसेने निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवत विरोधकांना कडवे आव्हान दिले हाते. पुन्हा एकदा उमेदवारांना निवडणुकींच्या रिंगणामध्ये उभे करणार असल्याचे बाळासाहेब गोळेसर यांनी सांगितले. यावेळी उपतालुकाध्यक्ष धनंजय बोडके, सागर वाघचौरे, राजश्री पवार, संजना पवार, श्वेता पवार, संगीता पवार यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचलन तालुका संघटक चेतन दराडे यांनी केले. अमित कांबळे यांनी आभार मानले.

नियुक्त पदाधिकारी

यावेळी शहर व ग्रामीण पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शहराध्यक्षपदी पांडुरंग गाडेकर, उपाध्यक्षपदी भिवाजी शिंदे, विजय भडांगे, संदीप मुत्रक, श्रीकांत पवार, आकाश लोखंडे, शहर संघटकपदी एकनाथ दिघे, कैलास सहाणे, शहर सरचिटणीसपदी दत्ता वरंदळ, अमित कांबळे, लखन खर्डे, उपशहर संघटकपदी शुभम सारंगधर,

जयेश घोडेकर, सोशल मिडिया प्रमुखपदी संतोष गांजवे, तालुका सचिवपदी भगवान आव्हाड, उप तालुकाध्यक्षपदी एकनाथ दळवी, रामदास खैरनार, सतिष आरोटे, तालुका सरचिटणीसपदी संतोष सानप, मुसळगाव गटाध्यक्षपदी सोमनाथ केदार, दापुर गटाध्यक्षपदी अमोल आव्हाड, पांढुर्ली गटाध्यक्षपदी शांताराम तुपे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com