मविप्र निवडणूक मंडळाची नियुक्ती

अध्यक्षपदी अ‍ॅड. भास्करराव चौरे
मविप्र निवडणूक मंडळाची नियुक्ती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

  मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (२०२२-२७ ) ( Maratha Vidya Prasarak Sanstha Election )निवडणूक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून  अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. भास्करराव खंडेराव चौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवादाची नियुक्ती झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेस लवकरच प्रांरभ होईल.

तसेच सदस्य म्हणून अ‍ॅड काशिनाथ रामदास खांदवे, अ‍ॅड. महेश वसंतराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवादाचे सचिव म्हणून संस्थेतील प्रा.डॉ. ज्ञानेश्वर काजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मविप्र संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक सभापती माणिकराव बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.31) रोजी पार पडली.

यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना हिरे, संचालक नानासाहेब महाले, भाऊसाहेब खातळे, दतात्रय पाटील, उत्तमबाबा भालेराव, डॉ विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे,

डॉ. जयंत पवार, रायभान काळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, अशोक पवार, हेमंत वाजे आदी उपस्थित होते. निवडणूक मंडळाकडे तालुकानिहाय अंतिम मतदार याद्या, संस्थेची घटना,नियमावली संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने सरचिटणीस व सभापती यांनी सुपूर्द केल्या. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. साधारणत: महिन्याभराची ही प्रक्रिया असून सप्टेंबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com