कळवण बाजार समितीसाठी वंचिततर्फे अर्ज दाखल

कळवण बाजार समितीसाठी वंचिततर्फे अर्ज दाखल

कळवण |Kalwan

अनेक तालुक्यातील बाजारसमितीच्या (Market Committee) निवडणुकांची प्रक्रिया सुरु झाली असून, या निवडणुकांसाठी इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर आज (दि. 3) रोजी कळवण बाजार समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) उडी घेतल्याने येथील निवडणुकीत यावर्षी नवा भिडू सज्ज झाला आहे.

कळवण बाजार समितीसाठी वंचिततर्फे अर्ज दाखल
नायब तहसीलदार बेमुदत संपावर; महसूलमंत्र्यांनी बोलावली बैठक

कळवण बाजार समितीसाठी सर्वसाधारण सोसायटी गटातून वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रदीप राजाराम निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या निवडणुकीत वंचितने पहिल्यांदाच धडक दिल्यामुळे या लढतीत आणखी एका भिडूची भर पडली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दरम्यान यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे ता. प्रमुख नाना देवरे, सचिन पगार, अशोक बाबा जाधव, वंचित युवाचे नरेंद्र गरुड, अभिमन दानी, समाधान इंगळे, प्रकाश बस्ते, किरण केदार यांसह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कळवण बाजार समितीसाठी वंचिततर्फे अर्ज दाखल
बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com