टीईटी परीक्षेसाठी असा भरा अर्ज, अशी असणार प्रक्रिया

टीईटी परीक्षेसाठी असा भरा अर्ज, अशी असणार प्रक्रिया

नाशिक | Nashik

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Examination Council) घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेचे (TET) वेळापत्रक जाहीर झाले आहे. येत्या १० ऑक्टोबरला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेसाठी ०३ ऑगस्ट २०२१ पासून नोंदणी सुरु झाली आहे. अधिकृत संकेतस्थळ mahatet.in वर नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २५ ऑगस्ट पर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र शालेय शिक्षण मंत्री, वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली होती की, राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET 2021) आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला परवानगी दिली आहे. दोन वर्षांनंतर टीईटीची परीक्षा होणार आहे. म्हणून १० लाखांहून अधिक इच्छुक उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टीईटी परीक्षेसाठी दोन पेपर असतात. यामध्ये एक पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. पेपर एक हा पहिली ते पाचवी वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असते. आणि पेपर दोन सहावी ते आठवी या वर्गासाठी अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी असते. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करु इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असतील.

परीक्षेचा प्रवेशपत्र (Admit Card) जारी करण्याची तारीख २५ सप्टेंबर आहे.- पेपर एक हा 10 ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ०१.०० या वेळेत होईल. तर पेपर-दोन परीक्षा १० ऑक्टोबर रोजी दुपारी ०२ ते ४.४० असा असणार आहे.

असा करा अर्ज

सुरवातीला या अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या. त्यानंतर होमपेजवर New Registration वर क्लिक करा. नोंदणी करून पोर्टलवर लॉग इन करा. आवश्यक तपशील भरा आणि अर्ज फी भरा. त्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट काढून घ्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com