सातपूर । प्रतिनिधी

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत नाशिक आयटीआय सातपूर येथे विशेष प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने दि. 6 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.

संस्थेतील प्रवेश पूर्ण क्षमतेने होण्याकरिता प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे व इयत्ता दहावीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारासाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रवेश अर्ज सादर करणे तसेच प्रवेश अर्जात दुरुस्ती करण्याची सुविधा दि.1 ते 4 जानेवारी दरम्यान उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

शासकीय आयटीआय सातपूर, नाशिक येथे फिटर, मशिनिस्ट, प्लंबर, पेंटर, स्टेनोग्राफी, वायरमन, वेल्डर, टूल अॅण्ड डाय मेकर यासह विविध ट्रेडसाठी एकूण रिक्त असलेल्या 345 जागा करिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्ज कोणत्याही ऑनलाइन स्रोतांमधून भरता येईल. जे उमेदवार नव्यांने प्रवेश अर्ज भरतील त्यांचा या प्रवेश फेरी प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. तसेच आजपर्यंत अर्ज भरूनसुद्धा ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांनी आपल्या प्रवेश अर्जात दुरुस्ती करून या फेरीसाठी संस्था निवडायची आहे.

प्रवेश प्रक्रिये दरम्यान उमेदवारानां काही अडचण आल्यास त्यांनी आयटीआय सातपूर नाशिक येथे संपर्क करावा. शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना जास्त मागणी होत आहे. तरी करोना काळात बदललेल्या परिस्थिती व वाढीव फेरीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा करून घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य राजेश मानकर यांनी केले आहे.