ई-छावणी पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन

सीईओ डॉ. राहुल गजभिये
ई-छावणी पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन

दे. कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

कॅन्टोन्मेंट बोर्ड (Deolali Cantonment Board )परिसरारातील जनतेला सर्व सुविधा एकाच पोर्टलद्वारे मिळणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये (The Chief Executive Officer of the Cantonment Board, Dr. Rahul Gajbhiye )यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

कोविड काळात परिस्थितीशी सामना करत असतांना देशभरातील सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्ड या सुविधांमुळे एकत्रित झाले असून थेट जनतेशी कोणतंही संपर्क न करता नागरिकांना ऑनलाईन सुविधा देण्यासाठी या पोर्टल व अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

ज्याद्वारे नागरिकांना ट्रेड-लायसन्स, एम कलेक्ट, नवीन कर आकारणी, नागरी तक्रार निवारण, ऑनलाईन भरणा, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, पाणी व भूमिगत गटारी संबधी अर्ज, पाणी टँकर बुकिंग आदीसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहे नागरिकांनी https://echhawani.gov.in/citizen या वेबसाईट अथवा ई-छावणी मोबाईल अ‍ॅपचा वापर करण्याबाबत सुचविण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com