शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्तीGovernment of India Scholarship , शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आणि राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे Assistant Commissioner of Social Welfare Sundarsingh Vasave यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2020 - 2021 या वर्षासाठी पुन्हा अर्ज व 2021 -2022 या वर्षाकरीतिा नवीन अर्ज सादर करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयामधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचार्‍यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून वेळेत सादर करण्याच्या सूचनाही सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केल्या आहेत.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करून अर्ज भरलेला असेल त्यांनी नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करू नये, अशा सूचनाही त्यांनी विद्यार्थ्यांना केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com