गोदावरी कालवा चार्‍या होणार भूमिगत

महसूल मंत्री विखे पाटलांचे प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
गोदावरी कालवा चार्‍या होणार भूमिगत

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

गोदावरी (godavari) कालव्याच्या चार्‍या अंडरग्राउंड (Underground) करण्यासाठी अधिकार्‍यांनी प्रस्ताव तयार करुन तो शासनाकडे सादर करण्याच्या सूचना

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) अधिकार्‍यांना केल्या. त्यासाठी निधी (fund) उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

नागपूर (nagpur) येथे कालवा सल्लागार समितीची बैठक महसूल मंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate), आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar), कोपरगावचे आमदार आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale), जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, मधुकर कोकाटे, नंदू बनकर, दीपक इंगळे, चंद्रभान महाले आदी उपस्थित होते. गोदावरीच्या मुख्य कालव्यास मोठ्या प्रमाणात गळती आहे.

शिवाय क्षमता कमी असल्यामुळे नागरिकांना शेतकर्‍यांना (farmers) पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे या कालव्याची क्षमता 750 क्युसेस करावी, अशी मागणी आ. कोकाटे यांनी केली. त्यावर ना. विखे यांनी अधिकार्‍यांना कालव्याची 55 किमी अंतरापर्यंत रुंदी वाढवण्याचे तसेच कालव्यालगतच्या मुख्य चार्‍या अंडरग्राउंड करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले.

त्याचबरोबर पोटचार्‍यांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना केल्या. या कामा संदर्भात पाठपुरावा करुन निधी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कर्मचारी वर्ग अपुरा असल्यामुळे आवर्तनाचे नियोजन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या प्रकल्पावरील कर्मचार्‍यांची संख्या तातडीने वाढवावी अशी मागणी तीन्ही आमदारांनी यावेळी मांडली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com