राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवा : खा. डॉ. पवार

राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवा : खा. डॉ. पवार

सुरगाणा । प्रतिनिधी

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाबंदी जाहीर केली असली, तरीही यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गुजरातचा सीमावर्ती भाग करोना स्प्रेडर्स बनले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनासह स्थानिक यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली. याबाबत खासदार डॉ. भारती पवार यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेऊन सीमावर्ती भागात नाकाबंदी वाढविण्यासह उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातून राज्याच्या सीमावर्ती भागातील हतगड, तळपाडा, श्रीभुवन, करंजूल, खुंटविहीर, पिंपळसोंड, हडकाईचोंड, बर्डीपाडा, रघतविहीर, मांधा, निंबारपाडा, राक्षसभुवन, सागपाडा, खिर्डी आदी गावे जवळ आहेत. ये - जा करण्यासाठी ई - पास घेणे आवश्यक असतानाही नाकाबंदीबाबत प्रशासनाचे कागदी घोडे नाचविणे सुरू होते.

याबाबत खासदार डॉ. भारती पवार यांनी दखल घेऊन प्रशासनाची झाडाझडती घेतली. यावेळी खा. पवार यांनी नागरिकांची ये - जा थांबविण्यासाठी बोरगाव, बर्डीपाडा, उंबरठाण, बार्‍हे या ठिकाणी करोना चाचणी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी तहसीलदार किशोर मराठे, पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, गटविकास अधिकारी दीपक भावसार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप रणवीर आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com