रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

मध्य रेल्वेने ( Central Railway )सर्व स्थानकांवर निकषांनुसार योग्य ठिकाणी पुरेशा प्रमाणात पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) उपलब्ध करून दिले आहेत.

परंतु तरीही असे आढळून आले आहे की, काही प्रवासी स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी किंवा एका प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी रुळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालून ट्रेनच्या कामकाजात अडथळा निर्माण करतात.

या संदर्भात स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी/बाहेर पडण्यासाठी किंवा एका प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल (एफओबी) वापरण्यासाठी स्थानकांवर नियमितपणे घोषणा केल्या जात आहेत.

आरपीएफने रूळांवरील अतिक्रमण (ट्रेसपासींग) करणार्‍यांविरुद्धच्या मोहिमेदरम्यान याची जाणीव करून दिली आहे की रेल्वे रूळ ओलांडणे केवळ त्यांच्या जीवालाच धोका देत नाही तर ते रेल्वे कायद्यानुसार दंडनीय आहे सर्व प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी रूळांवरील अतिक्रमण टाळावे आणि स्थानकांवर प्रदान केलेल्या एफओबी, एस्केलेटर, लिफ्टचा वापर करावा.

Related Stories

No stories found.