वीज बिल तुम्ही भरा ना, सहकार्य तुम्ही करा ना

वीज बिल तुम्ही भरा ना, सहकार्य तुम्ही करा ना

सातपूर | Satpur

सुरेल आणि थिरकत्या तालावरील गीताच्या माध्यमातून वीज बिल तुम्ही भरा ना, सहकार्य तुम्ही करा ना, असे आवाहन ग्राहकांना करतानाच त्याची गरज व महत्व या गाण्याच्या (Song) माध्यमातून विषद करण्यात आले आहे.

महावितरणमध्ये (Mahavitran) सहाय्यक अभियंता पदावरील प्रदीपकुमार गवई यांच्या संकल्पनेतून हे गीत साकारले असून, या गीताचे लेखन करण्यासोबतच त्यांनी गीत गायलेही आहे. अल्पावधीतच या व्हिडिओला यू ट्यूब (Youtube) , फेसबूकवर (Facebook) व राज्य भरातील विज मंडळ व ग्राहकांच्या पसंतीत उतरले आहे.या माध्यमातून समाजप्रबोधनाचा उद्देश सफल होत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

सातपूर (Satpur) येथे सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असलेले प्रदीपकुमार गवई हे मूळचे बुलढाणा तालुक्यातील शेगाव येथील आहेत. लहानपणापासून गाण्यासह नाविन्याची आवड त्यांनी? जोपासली होती. वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी साद घालण्यासाठी गाण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला.

आणि तत्काळ त्यांनी गीताचे शब्द जुळवण्यास सुरुवात केली. करोनाच्या संकटकाळातही (Corona Crisis) महावितरणच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी कार्यरत राहून वीजपुरवठा सुरळीत ठेवला, वायरमनचे काम तर नेहमी जोखमीचेच आहे. हे समजावून कुठलेही गैरसमज न ठेवता आपल्या महावितरणला सहकार्य करा, असे आवाहन करणारे गाणे त्यांच्या लेखणीतून उतरले.

त्यांच्या या संकल्पनेला मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी प्रोत्साहन देत काही मार्गदर्शक सूचना केल्या. स्वत: गवई यांच्यासह तनवी मनतोडे, श्रद्धा कुलकर्णी यांनी गाणे गायले आहे. अमित माळवे यांचे संगीत असून मिक्स मेन स्टुडिओत चेतन यांनी रेकॉर्डिंग केले. महावितरणच्या यूट्यूब चॅनलवर या गाण्याचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com