ई-पीक पाहणीत सहभागी होण्याचे आवाहन

ई-पीक पाहणीत सहभागी होण्याचे आवाहन

वाजगाव - शुभानंद देवरे wajgaon / Devla

महाराष्ट्र सरकारने या चालू वर्षी ई-पीक पाहणी मोबाईल अॅॅप E-Peek Pahani Mobile App सुरु केले असुन महसूल विभाग आणि कृषी विभागाच्यावतीनं ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प महाराष्ट्र राज्यात राबवण्यात आला असून त्या अनुषंगाने देवळा तालुक्यातील Devla Taluka महसूल विभागाकडून ई-पीक पाहणी नोंदविण्याबाबत गावो - गावी जनजागृती अभियान राबविण्यात आले.

वाजगाव ता.देवळा येथे "माझी शेती, माझा सातबारा, माझा पीक पेरा मीच नोंदविणार" या घोषवाक्याचा आधारे शासनाने सुरू केलेल्या पीक पाहणी नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या मोबाईल द्वारे नोंदविन्याबाबत जनजागृती अभियानाद्वारे देवळा तहसीलदार बनसोडे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले.

गावातील सर्वच शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी द्वारे आपल्या पिकाची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. ऑनलाईन पीक पाहणी नोंदणीचा शेतकऱ्यांना होणाऱ्या फायदा व तोट्या बाबत मार्गदर्शन करत एका मोबाईल जास्तीत जास्त जास्त 20 शेतकऱ्यांची ई-पीक पहानी नोंदविण्याची सुविधा आहे.

ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाची नोंदणी केल्यानंतर किमान आपल्या सोबतच्या, लगतच्या शेतकऱ्यांची नोंदणी करावी व गावातील युवकांनी "एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" याप्रमाणे आपली भारतीय संस्कृती जोपासत सहकार्याची भावना अंगी बाळगण्याचे आवाहन तहसीलदार बनसोडे यांनी केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना तलाठी गोपणारे व कुलदीप नरवाडे यांनी केली तर आभार प्रदान अमोल देवरे यांनी केले, कार्यक्रम यशस्विसाठी ग्रामविकास अधिकारी जे.व्ही.देवरे, व कृषी सहाय्यक मनीषा जाधव यांनी प्रयत्न केले.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच दिपक (उर्फ) बापू देवरे, पोलीस पाटील निशा देवरे, देवळा शेतकरी संघाचे व्हा.चेअरमन संजय गायकवाड, पर्वत गवळी, वि.वि.का.सह. सोसायटीचे चेअरमन शैलेंद्र देवरे, आनंदराव देवरे, रामचंद्र गवळी, केदा देवरे, अरुण देवरे, बाळासाहेब खैरणार, अमोल देवरे, विनोद देवरे, संजय देवरे, जगन्नाथ देवरे, यशवंत देवरे, प्रभाकर देवरे, संपत देवरे, विष्णू देवरे, कौतीक खैरणार, दौलत देवरे, हेमंत देवरे, अशोक देवरे, विश्वास महाले, पंढरीनाथ पवार, सोसायटी सचिव संदिप खैरणार आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com