स्थलांतरित कामगारांची माहिती द्यावी
नाशिक

स्थलांतरित कामगारांची माहिती द्यावी

कामगार उपायुक्तांचे आवाहन

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी Satpur

लॉकडाऊनच्या काळात आपल्या राज्यात निघून गेलेल्या परप्रांतीय कामगारांनी परत येण्यास सुरुवात केली असून परत येणार्‍या कामगारांनी आपली नोंदणी करणे बंधनकारक असल्याने कारखाना संचालकांनी या कामगारांची नोंदणी कामगार आयुक्तालयात करावी, असे आवाहन कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांनी केले आहे.

राज्य व केंद्र शासनाच्या कामगार विभाग व असंघटित कामगार विभागाच्यावतीने नाशिक जिल्हयातुन परराज्यात कामासाठी गेलेल्या कामगारांची व पर-राज्यातुन नाशिक जिल्ह्यात कामासाठी परत आलेल्या कामगारांची माहिती तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्या करीता नाशिक जिल्हयातील विविध आस्थापना, मालक संघटना, कामगार संघटना व परराज्य कामासाठी गेलेले कामगार यांना आवाहन करण्यात आले आहे.

आंतरराज्य स्थलांतरित कामगारांची माहिती तयार करावयाची आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात पर-राज्यातुन कामासाठी स्तलांतरीत कामगारांची माहिती परिशिष्ट इ-११ मध्ये विहित नमुन्यात एक्सेल शिट द्वारे कामगार उपायुक्त कायालयात व लेलुपीज्ञसारळश्र.लेा या ई-मेल वर पाठवावी.

तसेच नाशिक जिल्हयात पर-राज्यातुन कामासाठी आलेल्या आंतराज्य स्थलातरीत कामगारांनी इ-१ मध्ये विहित नमुन्यात एक्सेल शिट मध्ये भरुन या कार्यालयाच्या bocwnskgmail.com या ई-मेल पर पाठविण्याचे आवाहन कामगार उप आयुक्त गुलाबराव दाभाडे यांनी केलेे आहे.

Deshdoot
www.deshdoot.com