शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक ।प्रतिनिधी Nashik

देशातील विविध शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय ( Government of India Ministry of Manpower Development ) संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या ( नवबौध्दासहीत) विद्यार्थ्यांनासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती योजना ( Rajarshi Shahu Maharaj Merit Scholarship Scheme )राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडुन राबविली जाते.या योजनेसाठी सन 2021-22 या वर्षाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे (Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranware ) यांनी केले आहे.

राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या (नवबौध्दासहीत) विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड्ळनिहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापिठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवुन दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोद्णी फी,जिमखाना,ग्रंथलय, संगणक,तसेच वसतिगृह व भोजन शुल्क ही देण्यात येते. इत्यादी शुल्क विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येईल.

पदवी अभ्यासक्रमासाठी इ.12 वीत किमान 55 % गुण मिळविणे आवश्यक आहे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवीत किमान 55 % गुण मिळविणे आवश्यक आहे. तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख आहे. सदर शिष्यवृती करिता निवड झालेल्या विद्यार्थास भारत सरकार शिष्यवृतीचा लाभ मिळणार नाही. सदर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे तथापी पुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतात, परंतु त्यांचा विचार प्रथम वर्षाचे विध्यार्थी न मिळाल्यास करण्यात येईल.

सदर योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली आहे. सदर वेबसाईट वरुन अर्ज डाऊनलोड करून परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 11 मार्च रोजी सांय 6.15 वाजेपर्यंत swcedn.nationalscholar@gmail.com.लेा या ईमेल वर पाठवून त्याची हार्ड कॉपी पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय,3 चर्च रोड,पुणे 411001 येथे सादर करावा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com