कळवण
कळवण
नाशिक

कळवण नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी पगार

झूम अँपद्वारे बैठक

Gokul Pawar

Gokul Pawar

कळवण | Kalwan

कळवण नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अनुराधा पगार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तहसीलदार बी ए कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आज झूम अँपवर ऑनलाईन बैठक घेण्यात आली.

आवर्तनपद्धतीने उपनगराध्यक्ष अतुल पगार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज नगर पंचायतीच्या कार्यालयात तहसीलदार बी ए कापसे यांच्या अध्यक्षतेखाली आज झूम अँपवर ऑनलाईन बैठक घेण्यात आली.

यावेळी विहित मुदतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार यांच्या पत्नी अनुराधा पगार यांचे एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून कौतिक पगार, अनुमोदक म्हणून साहेबराव पगार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. अनुराधा पगार यांचा अर्ज वैध ठरल्याने त्यांची निवडणूक निर्णयाधिकारी कापसे यांनी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी संदिप भोळे यांनी काम पहिले.

Deshdoot
www.deshdoot.com