बाजार समितीत मनपाच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट

बाजार समितीत मनपाच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट

पंचवटी । वार्ताहर

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात येणार्‍या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी यांची मनपाच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. मंगळवार (दि.25 )रोजी 98 टेस्ट करण्यात आल्या यात सर्व निगेटिव्ह आलें.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिक शहरासह जिल्हाभरातील आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, दरी, मातोरी, मुंगसरा, दुगाव, दिंडोरी, ढकांबे, पिंपळनेर, आशेवाडी, आक्राळे, वरवडी,आंबे, शिवनई, ओझर, सय्यद पिंप्री, सिन्नर, शिंदे, ब्राम्हण गाव, वाडीवर्‍हे, त्र्यंबक, हरसूल आदी भागांतून पालेभाज्यांची आवक होत असते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये ता. 12 ते 23 मे पर्यंत कडक लॉकडाऊन केले होते.

यात बाजार समित्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. सोमवार (ता.23) पासून निर्बंध शिथिल करीत बाजार समित्या नियमाचे पालन करीत सूरु करण्यात आल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती व नाशिक महानगपालिकेच्या माध्यमातून रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आल्या. यावेळी बाजार समिती सभापती देविदास पिंगळे, संचालक तुकाराम पेखळे, संदीप पाटील, सचिव अरुण काळे, पंचवटी विभागीय वैद्यकिय अधिकारी विजय देवकर, दोन फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन, पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नेमाने, पोलिस हवालदार भडांगे आदी उपस्थित होते.मंगळवार (ता.25) रोजी 98 अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या यात सर्व निगेटीव्ह आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com