चार वर्षांपासून फरार संशयिताला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

चार वर्षांपासून फरार संशयिताला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीतून खंडणीच्या गुन्ह्यात २०१८ पासून फरार असलेल्या संशयिताला (Suspect) खंडणी विरोधी पथकाने जेलरोड (Jail Road) येथे सापळा रचून अटक (Arrested) केली आहे....

चार वर्षांपासून फरार संशयिताला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या
वलखेड फाट्यावर तिहेरी अपघात; एक जागीच ठार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू शंकर कदम (३२,रा.प्रकाश आंबेडकर नगर,केनोल रोड झोपडपट्टी,जेलरोड,नाशिकरोड) हा उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खंडणीच्या (Extortion) गुन्ह्यात २०१८ पासून फरार होता. खंडणी विरोधी पथकाचे (Anti Extortion Squad) पोलीस अंमलदार स्वप्नील जुंद्रे व मंगेश जगझाप यांना संशयित बाळू हा जेलरोड पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याची खबऱ्यांच्या मार्फत माहिती मिळाली यावरून खंडणी विरोधी पथकाने परिसरात सापळा रचून संशयित बाळू याला अटक करून पुढील तपास कामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.

चार वर्षांपासून फरार संशयिताला खंडणी विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या
शरद पवारांचे मविआ एकत्र लढण्याबाबत मोठे विधान

दरम्यान, ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सुर्यावंशी,उपनिरीक्षक दिलीप भोई,अंमलदार दिलीप सगळे,किशोर रोकडे,राजेंद्र भदाणे,दत्तात्रय चकोर,स्वप्नील जुंद्रे,भूषण सोनवणे,भगवान जाधव,मंगेश जगझाप,चारुदत्त निकम,विठ्ठल चव्हाण,सविता कदम आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या राबविली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com