
देवळाली कॅम्प । वार्ताहर
गेल्या दोन वर्षापासून थंडावलेली अतिक्रमण विरोधी मोहीम प्रशासनाने सुरू करत आठ गाड्यांची जप्ती केली आहे. तसेच इतर अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावेत अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे...(anti encroachment campaign in cantonment area)
कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Cantonment board ceo) डॉक्टर राहुल गजभिये यांचे मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक विजय गायकवाड, राजेंद्र कंगारे यांनी बुधवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.
याप्रांगी आठ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. मोहिमेत आरोग्य निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे सह पर्यवेक्षक विनोद खरालिया, राजेंद्र कंगारे, रोहिदास आहिरे, धीरज डुलगज, रोहिदास शेंडगे सह २३ कर्मचारी व तीन वाहने तैनात होते.