मास्क वापराविषयी तुमच्या मनात प्रश्न असतील ना?

जाणून घ्या सविस्तर
मास्क वापराविषयी तुमच्या मनात प्रश्न असतील ना?

नाशिक । Nashik

दुहेरी थराचा मास्क वापरावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. लसीकरण पूर्ण झाले तरी मास्क लावणे, हात धुणे आणि सोशल डिस्टंसिन्ग हे तीन निर्बंध पाळावेच लागणार आहेत. कोणता मास्क वापरावा? मास्क कसा घालावा? कसा धुवावा? किती दिवस वापरावा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत इंडिअन मेडिकल असोसिएशनच्या सचिव डॉ. कविता गाडेकर.

प्रश्न - मास्क कोणता वापरावा?

उत्तर- 1) एन 95. 2) डबल लेअर सर्जिकल 3) सर्जिकल व कापडी 4) तीन पदरी (ट्रिपल लेअर) कापडी मास्क. कापडी व सर्जिकल वापरणार असाल तर आतमध्ये सर्जिकल आणि वर कापडी असा वापरावा. यापैकी ज्यांना जो मास्क वापरणे शक्य आहे त्यांनी तो वापरावा परंतु तो स्वच्छच असावा.

प्रश्न - जे मास्क रोटेशनने वापरायचे आहेत ते कसे ठेवायचे?

उत्तर - घरी आल्यावर प्रत्येक मास्क काढल्यानंतर कापडी किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवावा. किंवा घरातील व्यक्ती जिथे फारशी जात नाही तिथे एका हँगरला टांगून ठेवावा. मास्क वापरायची मुदत संपली की टाकून द्यायचा.

प्रश्न : मास्क कसा घालावा?

उत्तर- कुठलाही मास्क वापरणार असाल तरी तो हनुवटीच्या खाली गेला पाहिजे. नाक आणि तोंडाच्या अवतीभोवती घट्ट बसला पाहिजे. तो लावल्यानंतर हवा गळती (एअरलिक) नसावी.

प्रश्न : मास्क कसा वापरावा ?

उत्तर- काही मास्कला कानाभोवती अडकवायच्या दोर्‍या असतात तर काही मास्कला डोक्याभोवती घट्ट करायच्या दोर्‍या असतात. मास्क कोणताही असो, दोर्‍या सोडून मास्कचा कोणत्याही भागाला हात लावू नये. काढ-घालीसाठी दोर्‍यांना हात लावावा. मास्क दोर्‍यांनीच पकडायचा आणि लावायचा. काही मास्कला आतून धातूची पट्टी असते. ती नाकाभोवती फिट करायची.

प्रश्न : मास्क धुवावा का?

उत्तर - 1) एन-95 हा मास्क धुवायचा नसतो.

2) सर्जिकल मास्कही धुवायचा नसतो.

3) कापडी मास्क रोज स्वच्छ धुवावा.

प्रश्न : एक मास्क किती दिवस वापरावा?

उत्तर - रोज एकच मास्क वापरायचा नाही. तुम्ही एकावेळी 5 ते 7 एन-95 मास्क घ्या. ते रोटेशनने वापरा. एक महिना झाला की ते मास्क वापरू नका.

2) एक सर्जिकल मास्क जास्तीत जास्त 10 वेळा वापरावा. तो डबल लेअरच घालावा.

3) कापडी मास्क रोज स्वच्छ धुवून वापरावा. फक्त तो खूप खराब होईपर्यंत वापरायचा नाही.

प्रश्न - मास्क नष्ट कसा करावा?

उत्तर- मास्क कोणत्याही प्रकारचा असो, तो हायड्रोक्लोराइडमध्ये अर्धा तास ठेवा. नंतर स्वच्छ धुवून मग एका पिशवीत टाकूनच घंटागाडीत टाकावा. म्हणजे त्यापासून अन्य कोणालाही संसर्ग होणार नाही. मास्क टाकतांना त्याच्या दोर्‍या कापून टाकाव्यात.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com