
नाशिक | Nashik
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत (Jindal Polyfilm Company)आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत २५ पेक्षा अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने यातील १७ जणांना बाहेर काढण्यात आले होते. त्यावेळी यामधील १४ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. यामधील ११ कामगारांना खाजगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक होती. तर उर्वरित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यातील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर आता अजून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महिमा (वय २०) व अंजली (वय २७) असे मृत्यू झालेल्या महिलांचे नाव असून त्या कर्मचारी असल्याचे समजते. तसेच इतर दोघांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर गणेश यादव, हिरामण यादव, मोहन पवित्रा सर्जित कुमार, कैलास कुमार श्यामसुंदर यादव, गोस्वामी श्रद्धा, कतयार याचिका, पूजा सिंह, तालीम अबू पाठक, मनोज लखन सिंह, गजेंद्र सिंह अशी जखमींची नावे आहेत.