
नाशिक । प्रतिनिधी Nashik
निफाड तालुक्यातील ( Niphad Taluka )नवीन निवडून आलेल्या 13 सरपंचांनी व 5 उपसरपंचांनी त्याचप्रमाणे कळवण तालुक्यातील 5 सरपंचांनी मुंबई येथे बाळासाहेबांंची शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. याच प्रवेश सोहळ्यात देवळ्याचे उपजिल्हाप्रमुख देवा वाघ यांंनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना( Uddhav Balasaheb Thackeray Shivsena) पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुंबई येथे मुख्यमंंत्र्यांच्या नंदनवन या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात या सर्वांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे राज्य प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी आमदार धनराज महाले, संजय बच्छाव, जयंत साठी, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सह संपर्कप्रमुख राजेंद्र सोनवणे, ग्रामीण जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, शिंदे गटाचे निफाड तालुका अध्यक्ष अनिल कुंदे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
मुंंबई येथे झालेल्या प्रवेश कार्यक्रमात निफाड तालुक्यातील 13 सरपंचांनी व 5 उपसरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याचप्रमाणे कळवण तालुक्यातील 5 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. देवळ्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख देवा वाघ यांनीही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी निफाड आणि कळवणमधील जवळजवळ 50 पदाधिकार्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.