भुसे शिवारात दुसरा बिबट्या जेरबंद

भुसे शिवारात दुसरा बिबट्या जेरबंद

करंजीखुर्द | Karnji khurd

भुसे शिवारात (Bhise Shiway) तीन दिवसांपूर्वी ज्या परिसरात बिबट्या जेरबंद ( Leopard Caught) केला त्याच परिसरात काल गुरुवार (दि.०१) जुलै रोजी पहाटेच्या सुमारास वनविभागाने (Nashik Forest Departments) लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला आहे.

भुसे शिवारात बिबट्याच्या संचाराने नागरिक भयभीत झाले होते. परिणामी वनविभागाने ज्ञानेश्वर आघाव यांच्या(Dnyaneshwar Aaghav Vasti) वस्तीजवळ पिंजरा लावला होता. 28 जून रोजी या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला होता.

मात्र परिसरातील शेतकर्‍यांनी शिवारात दोन बिबटे संचार करीत असल्याची माहिती वनविभागाला देताच वनविभागाने या ठिकाणी दुसरा पिंजरा लावला होता. परिणामी 1 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास भक्ष्य शोधण्याच्या नादात बिबट्याची मादी पिंजर्‍यात शिरली अन् अलगद अडकली.

दोन दिवसात या परिसरातून नर व मादी अशा दोन बिबट्यांना जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर काल बिबट्याची मादी पिंजर्‍यात जेरबंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com