नरेश कारडांवर 'इतक्या' कोटींच्या फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल; पोलीस कोठडीत देखील वाढ

नरेश कारडांवर 'इतक्या' कोटींच्या फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल;  पोलीस कोठडीत देखील वाढ

नाशिक | प्रतिनिधी

१ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुक प्रकरणी ताब्यात असलेले नाशिक शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक तथा कारडा कन्स्ट्रक्शनचे चेअरमन नरेश कारडा यांच्यावर शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात आज आणखी एक ४ कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुर्वीच्या गुन्ह्यात त्यांची आज (दि.५) पर्यंत पोलीस कोठडी होती. तर मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात उभे करण्यात आल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीत वाढ केली.

नरेश कारडा यांच्यासह चौघांवर मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांपैकी नरेश कारडा यांना ३० ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेले आहे. दरम्यान याच गुन्ह्यातील संशयित तथा त्यांचे बंधू मनोहर कारडा यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. तरी पोलीस इतर दोघांचा शोध घेत आहे.

नरेश कारडांवर 'इतक्या' कोटींच्या फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल;  पोलीस कोठडीत देखील वाढ
नाशिक जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतीसाठी 'इतके' टक्के मतदान

दरम्यान, या प्रकरणाचा तपास शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख तपास करीत आहे. राहुल जयप्रकाश लोनावत यांनी कारडा फसवणुक प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार चेअरमन नरेश कारडा, मॅनेजिंग डायरेक्टर मनोहर कारडा, देवेश कारडा व संदिप शहा यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

लोनावत यांनी नरेश कारडा यांच्या कारडा कन्स्ट्रकशनला डेव्हलपमेंटचे काम दिले होते. त्या बांधकामाच्या बदल्यात लोनावतकडून कारडा यांनी १ कोटी २० लाख स्विकारुन बांधकाम देखील पुर्ण केले नाही तसेच ही रक्कम लोनावत यांना परत न करता त्यांनी मोठी आर्थिक फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश कारडांवर 'इतक्या' कोटींच्या फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल;  पोलीस कोठडीत देखील वाढ
अरिंगळे व बलकवडे यांच्याकडून जरांगेच्या तब्येतीची विचारपूस

४ कोटींची फसवणूक

नरेश कारडा यांच्याविरोधात शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे फसवणुकीसंदर्भात सतत तक्रारी येत आहे. तर आज शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कारडा यांनी चार कोटींची फसवणूक केल्या प्रकरणी जळगांव येथील सलिल देवकर नामक व्यक्तीने फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. २०१७ मध्ये देवकरांकडून कारडा यांनी पैसे स्विकारुन पंचक भागात प्लॉट देतो असले सांगितले होते, तर प्लॉट ही दिले नाही व पैसेही परत केले नाही, म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक (आर्थिक गुन्हे) भगीरथ देशमुख यांनी दिली.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com