आधाराश्रमाच्या संचालकावर आणखी एक गुन्हा दाखल

आधाराश्रमाच्या संचालकावर आणखी एक गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

म्हसरूळ (mhasrul) येथील ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमाच्या (Aadharashram) संचालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराप्रकरणी (Abuse of a minor girl) सातव्या पिडीत मुलीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला.

द किंग फाउंडेशन (The King Foundation) ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमाचा संचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने चौदा वर्षीय अल्पवयीन आदिवासी (tribal) मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार (Child sexual abuse) पोस्को (Posco) व ऍट्रॉसिटी (Atrocity) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला ३० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान बुधवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याप्रकरणाचा तपास सुरु असतांना मोरे याने सातव्या पिडीत मुलीवर अत्याचार केल्याचे तपासात समोर आल्याने त्याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणामध्ये आत्तापर्यंत सहा अल्पवयीन मुलीसह एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सदरहू प्रकरण गंभीर असल्याने चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात येऊन सात दिवसात अहवाल सादर करण्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister for Women and Child Development Mangalprabhat Lodha) यांनी दोन दिवसांपूर्वी निर्देश दिले आहेत. त्यानुसार चौकशी समिती तपास करत असून लवकरच याचा सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे.

पीडित सहा मुलींना पोलिसांनी शासकीय मुलींच्या निवारागृहात हलवले आहे. तसेच अन्य सात मुलींना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. म्हसरूळ शिवारात ज्या रो हाऊसमध्ये भाडेतत्त्वावर आधारश्रम चालवली जात होते त्या रो हाऊसचा पंचनामा पोलिसांतर्फे करण्यातला आहे. . पीडित अल्पवयीन मुलींसोबत पोलिसांकडून संवाद साधला जात आहे. तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडून याप्रकरणी मुलींशी चर्चा करून त्यांच्या समुपदेशनावरही भर दिला जात असून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com