Photo Gallery : इस्कॉन मंदिरात हजार किलो फुलांचा अभिषेक

Photo Gallery : इस्कॉन मंदिरात हजार किलो फुलांचा अभिषेक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भगवंतांच्या सेवेत आपण काय अर्पण करतो यापेक्षा आपला भावना काय असतात हे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन श्रीमान शिक्षाष्टकम प्रभू यांनी केले...

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), नाशिकतर्फे आयोजित पुष्पाभिषेक महोत्सवात भाविकांना उद्देशून त्यांनी हे उद्गार काढले. इस्कॉन मंदिरातील (ISKCON temple) श्री राधा मदनगोपालजींच्या (Shri Radha Madangopal) प्राणप्रतिष्ठेला 11 वर्ष पूर्ण होत आहे.

याच निमित्ताने राधा कृष्णांच्याविग्रहांचा पुष्पाभिषेक करण्यात आला. कृष्ण मंदिरात (Krishna Temple) साजरा होणारा हा प्रसिद्ध महोत्सव असून अबालवृधांना तो आकर्षित करतो.

या महोत्सवाला सकाळी 5 वाजता मंगल आरतीने सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्री भागवत प्रवचन झाले. सायंकाळी 6 वाजेपासून मंदिरात कीर्तन सुरु होते. त्यानंतर प्रवचनातून श्रीमान शिक्षाष्टकम प्रभुंद्वारे भाविकांना प्रबोधन करण्यात आले. यावर्षी तब्बल एक हजार किलो विविध रंगी फूलांच्या पाकळयांनी श्री राधा मदन गोपालजींच्या विग्रहांचा अभिषेक करण्यात आला.

मोगरा, गुलाब, चाफा, झेंडू, सोन चाफा, चमेली, बिजली तसेच वृंदावन आणि सोलापूरहून आणलेला देशी गुलाब, बंगलोरहून आणलेले सायली व मोगरा आदी फुलांचा (Flowers) अभिषेकामुळे मंदिर प्रांगणात वेगळेच वातावरण तयार झाले होते.

पुष्पांनी तसेच पर्यावरण अनुकुल कागदांनी सजवलेली वेदी, विग्रहांचे सुंदर मनोहर रूप भावकांच्या आकर्षणाचे केंद्र हाते. या दर्शनासाठी कृष्णभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

भजन संकिर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदीर प्रांगणात भाविकांनी मोठी गर्दी लोटलेली होती. पुष्पाभिषेकाच्या वेळी श्री राधा मदन गोपालजींच्या जयघोषाने परिसर दूमदूमून गेला होता.

Related Stories

No stories found.