‘हे’ आहेत जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक

‘हे’ आहेत जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक
जिल्हा परिषद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

करोनामुळे (Corona) गेल्यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारांची (Zilla Parishad Teachers Award) घोषणा झाली नाही. सलग दुसऱ्या वर्षीही या पुरस्कारांना मुहूर्त मिळणार की नाही, अशी शक्यता वर्तविली जात होती...

प्रशासनाने सलग दुसऱ्या वर्षी खंड न पडू देता आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करत शिक्षकांना 'आदर्श शिक्षक पुरस्कारा' ची भेट दिली आहे.

यावर्षी पुरस्कारासाठी जिल्ह्याभरातून ४५ प्रस्ताव प्राप्त होणे अपेक्षित असताना केवळ २३ प्रस्तावच प्राप्त झाले होते. त्यातून पंधरा आदर्श शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

दि. ५ सप्टेंबर २०२१चे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) व मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड (Leena Bansod) यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले.

प्राप्त प्रस्तावांची गट शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत गट बदलून पडताळणी करण्यात आली होती. पडताळणी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे १५ तालुक्यातून १५ शिक्षकांची जिल्हास्तरीय पुरस्कार निवड समितीने निवड केली. त्यानुसार विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांनी त्यास मान्यता दिली आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे

 • शशिकांत काशिनाथ शिंदे, जि. प. शाळा हिरावाडी (ब्राम्हणगांव) ता. बागलाण,

 • मंजुषा बबन लोखंडे, जि. प. शाळा भोयेगाव ता. चांदवड,

 • स्वाती केशव शेवाळे, जि. प. शाळा उमराणे ता. देवळा,

 • नितीन कौतिक देवरे, जि.प. शाळा महाजे ता. दिंडोरी,

 • कैलास यादव शिंदे, जि.प. शाळा खैरगांव ता. इगतपुरी,

 • देविदास भिला मोरे, जि. प. शाळा कळवण मुले ता. कळवण,

 • सर्जेराव रावजी देसले, जि.प. शाळा नगाव दिगर ता. मालेगाव,

 • संदिप कडू हिरे, जि.प. शाळा चांदोरी ता. निफाड,

 • जयंत रामचंद्र जाधव, जि. प. शाळा दुगाव ता. नाशिक,

 • निलेश नारायणराव शितोळे, जि. प. शाळा जातेगांव ता. नांदगांव,

 • प्रमोद वसंत अहिरे, जि. प. शाळा बोरवठ ता. पेठ,

 • विजय तुकाराम निरगुडे, जि. प. शाळा पाटोळे, ता. सिन्नर,

 • हरेराम मोहन गायकवाड, जि.प. शाळा सराड, ता. सुरगाणा,

 • रविंद्र गंगाराम लहारे, जि. प. शाळा सोमनाथनगर ता. त्र्यंबकेश्वर,

 • संदिप जगन्नाथ वारुळे, जि. प. शाळा गारखेडे ता. येवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com