सीईटी सेलमार्फत पदव्युत्तर प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर

सीईटी सेलमार्फत पदव्युत्तर प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल)ने CET Cell पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असलेल्या एमबीए MBA आणि एमसीए MCA यासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

त्यानुसार, सीईटी दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 20 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करायची आहे.

सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेची प्रतीक्षा होती. अखेर दहा नोव्हेंबरपासून सीईटी सेलमार्फत प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.या वेळापत्रकानुसार इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबरच्या सायंकाळी पाचपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत राबविल्या जाणार्‍या एमबीए/एमएमएस, एमसीए, एमई/एम.टेक., एम.फार्म./ डी. फार्म आणि एम आर्क. या अभ्यासक्रमांचा या प्रवेशप्रक्रियेमध्ये समावेश आहे. नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कॅप राउंडच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रवेशप्रक्रियेच्या अधिकृत वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com