डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य पुरस्कारांची घोषणा; 'यांचा' होणार गौरव

डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य पुरस्कारांची घोषणा; 'यांचा' होणार गौरव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील (Dr. Vitthalrao Vikhe-Patil) यांच्या १२० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या २०१९ च्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे...

ज्येष्ठ साहित्यिक व समिक्षक डॉ. रमेश धोंगडे (Dr. Ramesh Dhongade) यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मकरंद साठे (Makrand Sathe) (पुणे) यांच्या गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी या कादंबरीस, विशेष साहित्य पुरस्कार नितीन भारत वाघ (Nitin Wagh) (नाशिक) यांच्या प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत या समीक्षा ग्रंथास दिला जाणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे (Dr. Raosaheb Kasbe) यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार अर्चना डावखर (Archana Davkhar) (नेवासा) यांच्या अधांतरीचे प्रश्न या कवितासंग्रहास, अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार सुधाकर शेलार (Sudhakar Shelar) (अहमदनगर) यांच्या साहित्य संशोधन वाटा आणि वळणे या समीक्षा ग्रंथास देण्यात येणार आहे.

यावर्षीचा समाज प्रबोधन पुरस्कार लातूर येथील अतुल देऊळगावकर (Atul Deulgaonkar) यांना, तर नाट्यसेवा पुरस्कार पुणे येथील आशुतोष पोतदार (Ashutosh Potdar) यांना मिळणार आहे.

कलागौरव पुरस्कार मुंबई येथील नंदेश उमप (Nandesh Umap) यांना देण्यात येणार असल्याचेही पुरस्कार निवड समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. करोनामुळे (Corona) २०१९ च्या पुरस्कारांचे वितरण मागील वर्षी होऊ शकले नव्हते. पुरस्कार देण्याची ही ३० वर्षांची परंपरा प्रवरा परिवाराने जोपासली आहे.

२२ ऑगस्टला पुरस्कार वितरण

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे (Dr. Raosaheb Kasbe) यांच्या उपस्थितीत रविवार दि.२२ ऑगस्ट २०२१ रोजी प्रवरानगर येथे करोना नियमावलींचे पालन करून छोटेखानी समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांसह राज्यातील इतर मान्यवर यावेळी सहभागी होतील. हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन समितीच्यावतीने सुरु असल्याचे निवड समितीचे सदस्य-निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर (Dr. Rajendra Salalkar) यांनी सांगितले.

पुरस्कार निवड समितीमध्ये डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे व डॉ. राजेंद्र सलालकर यांनी काम पहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com