८४ सोसायट्यांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला

८४ सोसायट्यांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील 84 विविध कार्यकारी सोसायट्या व संस्थांचा निवडणूक कार्यक्रम (Election programs of societies and organizations ) जाहीर झाला आहे. त्यातील 47 सोसायट्यांची निवडणूक 15 मे रोजी, 29 सोसायट्यांची निवडणूक 21 मे, तर 8 सोसायट्यांची निवडणूक 23 मे 2022 रोजी होणार आहे. जिल्ह्यातील 47 सोसायट्यांसाठी 15 मे रोजी मतदान होऊन लगेच मतमोजणी करण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या (State Co-operative Electoral Authority ) मान्यतेने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

यामध्ये प्रामुख्याने देवळा, लाडूद, मालेगाव, कसबेवणी, शिरवाडे वणी, बोपेगाव, रूई, वनसगाव, रानवड, मुसळगाव आदी सोसायट्यांचा समावेश आहे. 29 सोसायट्या व सहकार संस्थांची निवडणूक 21 मे रोजी घेण्यात येणार असून, सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी 21 एप्रिल पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. 22 एप्रिल रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार असून, 25 एप्रिल रोजी वैध अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.दि. 25 एप्रिल ते 9 मे या कालावधीत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 10 मे रोजी निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार असून दि. 21 मे रोजी मतदान घेतले जाणार आहे.

सोसायटी निवडणुकीसाठी 11 ते 19 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. 20 एप्रिल रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार असून, 21 एप्रिल रोजी वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. 21 एप्रिल ते 5 मे या कालावधीत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 6 मे रोजी निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार असून, दि. 15 मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. लगेच मतमोजणी होणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने वरवंडी लोहोणेर, ताहाराबाद, लखमापूर, वडनेर भैरव, शेवगेडांग, लासलगाव, ब्राह्मणगाव, तामसवाडी, वडाळीनजीक या या संस्थांचा समावेश आहे. 8 सोसायट्या व सहकार संस्थांची निवडणूक दि. 23 मे रोजी घेण्यात येणार असून, या सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी 13 ते 21 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. 22 एप्रिल रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी केली जाणार असून, 25 एप्रिल रोजी वैध अर्जाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. 25 एप्रिल ते 9 मे या कालावधीत अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 23 मे रोजी मतदान होईल.

Related Stories

No stories found.