
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
चांदवड तालुक्यातील (chandwad taluka) शिवरे या गावात एका विधवा महिलेचे (widowed woman) तोंड काळे करून व चप्पलांचा हार घालून गावातून तिची धिंड काढल्या प्रकरणी जादुटोणा विरोधी कायद्याचे (Anti-Witchcraft Act) कलम लावण्याची मागणी महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
मागणीचे निवेदन (memorandum) त्यांनी ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Rural District Superintendent of Police Shahaji Umap) यांना दिलेे. शिवाय स्थानिक वडनेर भैरव (Vadner Bhairav) येथील पोलीस आधिकार्यांना पण तशी विनंती केली आहे. विधवा महिलेचे तिच्या पतीच्या निधनानंतर सासरच्या लोकांशी वाद झाले होते. त्यातुन दशक्रिया विधीच्या दिवशी तिची धिंड काढण्यात आली. या घटनेत गुन्हा दाखल होत नव्हता महाराष्ट्र अंनिसने (Maharashtra Annis) प्रभावी हस्तक्षेप केला.
विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोर्हे (Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe) यांच्यामार्फत पोलीस महासंचालक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या.त्यामुळे गुन्हा दाखल झाला. मात्र या घटनेमागे अंधश्रद्धा असावी अशी शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. ती शक्यता खरी ठरली कारण सदर महिलेने आपल्या फिर्यादीत तसे म्हटले आहे.
त्यानुसार आरोपींनी असे म्हटले आहे की हिच्या अंगात देवी आली,तिची पुजा करा, तिची मिरवणूक काढा. सदरचे कृत्य हे जादुटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणारे आहे,म्हणून त्या कायद्याचे कलम लावावेत ,अशी विनंती डॉ गोराणे व चांदगुडे यांनी केली आहे.