अण्णाभाऊ साठे जयंती
अण्णाभाऊ साठे जयंती
नाशिक

अण्णाभाऊंची लेखनी कष्टकर्‍यांसाठी झिजली

पालकमंत्रि भुजबळ : अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Kundan Rajput

नाशिक । Nashik

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून तसेच लोककलेतून सामान्य कष्टकरी जनतेच्या प्रचारासाठी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शनिवारी (दि.१) भुजबळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले.

तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले.

तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली.

आण्णाभाऊ साठे यांच हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्यभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, माजी आ. जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक आदी उपस्थित होते.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com