'अंजनेरी' निसर्गाचा खजिना लघुपटाचे पहिले स्क्रीनिंग

'अंजनेरी' निसर्गाचा खजिना लघुपटाचे पहिले स्क्रीनिंग

नाशिक | प्रतिनिधी Nashik

डॉ संजय औटी व प्रवीण पगारे (Dr. Sanjay Auti and Shri. Pravin Pagare) यांच्या 'अंजनेरी-निसर्गाचा लपलेला खजिना' (anjaneri- The Hidden treasure) या लघुपटाचे पहिले स्क्रिनिंग नुकतेच पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे पर्यावरण तज्ज्ञ व पत्रकार अभिजित घोरपडे (Abhijit Ghorpade, Environment expert and Journalist), उपसरपंच गणेश पाटील, समारंभाचे अध्यक्ष गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी (Dr.M.S. Gosavi, Secretary , Gokhale Education society) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला...

अंजनेरी (Anjneri Mountain) गडावर खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता (bio diversity) आहे. या पठारावरून वनस्पतींच्या दोन प्रजातींची नोंद पहिल्या प्रथम केली गेलेली आहे.

याबरोबरच इंडीगोफेरा संतापूई (लाल फुलांची नीळ) या वनस्पतीची नोंदही केली गेली आहे. वनस्पतींबरोबरच १०५ पक्ष्यांच्या प्रजाती, लाल चोचीच्या दुर्मीळ गिधाडांचे येथे ५०० पेक्षा जास्त अधिवास आहेत. या पठारावरील सर्वच वनस्पतींची ओळख व त्यांच्या गुणधर्माविषयीचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

शिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान व अंजनी मातेचे वस्ती स्थान असल्यामुळे एक तीर्थस्नान म्हणून प्रसिद्ध आहे. याच बरोबर अंजनेरीच्या गडावर खूप मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. हे खूप कमी लोकांना माहित आहे म्हणून अंजनेरी पठाराची वैशिष्ट्ये व जैवविविधतेच्या कारणांची माहिती देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला आहे.

पठारावर वेगवेगळ्या प्रकारचे निसर्गनिर्मित असंख्य अधिवास व सूक्ष्म आदिवास तयार झालेले आहेत, या अधिवासांचा वैशिष्ट्यपूर्ण विविधतेमुळे अंजनेरीचे पठार हे जैवविविधतेने समृद्ध असे आहे. पठारावर चारशेहून अधिक वनस्पतींच्या प्रजातींची नोंद केलेली असून यापैकी 125 वनस्पती या प्रदेशनिष्ठ आहेत. महत्वाचे म्हणजे याच पठारावरून वनस्पतींच्या दोन प्रजातींची नोंद पहिल्याप्रथम केली गेलेली आहे.

(स्थानिक भाषेत खरपुडी (kharpudi) या वनस्पतींची नोंद 2006 साली व त्यानंतर 2019 मध्ये वाघाटी (Waghati) या वनस्पतीची 1874 नंतर प्रथमच नोंद केली गेली. याबरोबरच (लाल फुलांची नीळ) या वनस्पतीची नोंदही केली गेली आहे. वनस्पतींबरोबरच 105 पक्ष्यांच्या प्रजाती, लाल चोचीच्या दुर्मिळ गिधाडांचे येथे 500 पेक्षा जास्त अधिवास आहेत. तसेच असंख्य कीटकांचे व फुलपाखरांचे प्रकार, सरपटणारे प्राणी व डोंगर(mountain) उतारावरील जंगलात अनेक प्राण्यांचा वावर आहे. यात तरस बिबट्याचा समावेश आहे. यावरूनच अंजनेरीची जैवविविधता किती समृद्ध आहे याची कल्पना येते.

पठारावरील सर्वच वनस्पतींची ओळख व त्यांच्या गुणधर्माविषयीचा अभ्यास होणे गरजेचे आहे. पठारावर कोणत्या वनस्पतीच्या प्रजाती आहेत, हे कळले नाही तर कशाचे संवर्धन करायचे हा प्रश्न निर्माण होईल अधिवासांचा अभ्यास होणे गरजेचे आहे.

त्याच बरोबर कोणत्या वनस्पती पठारावरत आहेत. यांची माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच एखाद्या प्रजातीचेच किंवा वनस्पतींचे संवर्धन करावयाचे ठरविल्यास ते ही योग्य होणार नाही उदाहरण द्यायचे झाल्यास सेरोपेजिया अंजनेरी (Anjaneri) का ही प्रजाती फक्त अंजनेरी पठारावरच आढळते.

त्यामुळे फक्त त्याच प्रजातीचे संवर्धन करायचे ठरवल्यास हे अत्यंत चुकीचे होऊ शकते. संवर्धन करावयाचे असल्यास संपूर्ण परिसंस्थेचे संवर्धन करणे योग्य होईल. पठारावरील परिसंस्थाही खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. फायद्या तोट्याचा विचार न करता अंजनेरी हा एक निसर्गाचा अमूल्य ठेवा असून आपल्याला त्याची अनुभूती घेता यावी तसेच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे हा सार्थ विचार समाज आणि सरकार या दोन्ही स्तरावर होणे गरजेचे आहे.

ही सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचावी व लोकसहभागातून या निसर्गसंपदेचं जतन करण्याची जागरूकता वाढावी याकरता ही फिल्म समर्पित असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com