देवळालीचा कोंडवाडा पडलाय सुना सुना, जनावरे फिरताय मोकाट

देवळालीचा कोंडवाडा पडलाय सुना सुना, जनावरे फिरताय मोकाट

देवळाली कॅम्प । Deolali Camp

शहरातील (Deolali Camp) नागरिकांना मोकाट जनावरांचा त्रास होत असल्याने ब्रिटीशकाळापासून असे जनावरे कोंडवाड्यात टाकण्यासाठी असलेली सुविधा सध्या बंद झाल्याने नागरिकांच्या समस्येत वाढ झाली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाने (Cantonment Board) बाजार परिसरात स्वतंत्ररित्या कोंडवाड्याची निर्मिती करून शहर व परिसरातील मोकाट जनावरे येथे बंदिस्त केले जात असे. त्यांच्यासाठी चारा व पाण्याची व्यवस्था केली जात होती. जितके दिवस जनावरे कोंडवाड्यात राहिली तितक्या दिवसांचा दंड जनावरांच्या मालकांकडून वसुल केला जात असे. परंतु गेल्या 8-10 वर्षांपासून ही प्रथा बंद असल्यामुळे मोकाट जनावरांना मोकळे रान झाले आहे.

त्यामुळे बाजार परिसरात दुचाकींचे अपघात वाढले आहेत. घोळक्याने ठाण मांडून बसणार्‍या या जनावरांमुळे पहाटेच्या सुमारास वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही जनावरे पाळीव असूनही त्यांचे मालक त्यांना मोकाट सोडून देतात. रेस्ट कॅम्प रोड, लॅम रोड, वडनेर रोड, मिठाई स्ट्रीट, गुरुद्वारा रोड, विजय नगर, हैसन रोड,आनंद रोड या परिसरात अशा मोकाट जनावरांमुळे मोठी भीती निर्माण झाली आहे.

लष्करी हद्दीतही ही जनावरे मोकाट फिरत असल्याने तेथील जवानांना या जनावरांच्या मागे धावावे लागते. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाने कोंडवाड्याची पद्धत पुन्हा सुरू करून संबंधित मालकांकडून दंड वसुल करावा, अशी मागणी होत आहे. याबाबत प्रशासना ने सारासार विचार करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.

कोंडवाड्याची इमारत पडून...!

बोर्ड प्रशासनाने मोकाट जनावरांसाठी स्वतंत्र कोंडवाड्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय मागील बोर्डाने बोर्डात ठराव पारित करून वडनेर रोड, रेस्ट कॅम्प रोड येथे कोंडवाड्याची निर्मिती करून त्या त्या भागातील मोकाट जनावरे तिथेच बंदिस्त करून ती पांजरपोळ येथे देण्यात यावी असे निश्चित केलेले आहे

- भगवान कटारिया,माजी उपाध्यक्ष

मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास होत आहे,एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याची दखल घेऊन प्रशासनाने कार्यवाही करावी

-ऍड बाळासाहेब आडके,अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com