स्टेट बँक खातेदारांचा संताप

स्टेट बँक खातेदारांचा संताप

कळवण। प्रतिनिधी Kalwan

कळवण शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाचा ( State Bank Of India - Kalwan )संपूर्ण कारभार फक्त चारच सेवकांंवर ( Four Employees ) सुरू आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांची गैरसोय ( Inconvenience to account holders )होत आहे. वेळेचा अपव्यव होत असल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्टेट बँकेच्या या शाखेला सध्या शाखाधिकारी नसल्याने शेतकर्‍यांबरोबर व्यावसायिक, नोकरदार, बेरोजगार यांंची कर्जप्रकरणे प्रलंबित आहे, तर सुरक्षारक्षकाला इतर दुसरी कामे करावी लागत असल्याने, बँकेची सुरक्षाही धोक्यात आली आहे. राष्ट्रीयकृत बँक असल्याने शासकीय सेवक, वयोवृद्ध महिला, पुरुष, शेतकरी व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर ग्राहक आहे.

दररोज शेतकर्‍यांचे जुनी र्जखाती अद्ययावत करणे, पीक कर्ज, शेतीविषयक कर्ज, निराधार मानधन, शैक्षणिक कर्ज नोकरदार लोकांसाठी वाहन कर्ज आदी कामासाठी ग्राहक बँकेत जातात. सेवानिवृत्त सेवकांंची पेन्शनही याच बँकेत होते. त्यामुळे परिसरातील ग्राहकांचा नित्याचा संंबंध असल्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहक बँकेत येतात.

बँकेत कर्मचार्‍यांचा तुटवडा जाणवत असल्याने, ग्राहकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सध्या बँकेला शाखा अधिकारी नसून इतर पदे रिक्त असून चारच सेवक बँकेत कार्यरत असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या शाखेतील काही कर्मचारी सेवानिवृत्त तर काही जणांची बदली झालेली आहे. बँकेचा कारभार पाहण्यासाठी 10 पदे मंजूर आहेत. परंतु सध्या चारच कर्मचार्‍यावर संपूर्ण बँकेचे कामकाज सुरू आहे.

ग्राहकांच्या रांगा

अनेक दिवसांपासून शाखा व्यवस्थापक आलेले नसून गेल्या दोन दिवसांपासून एकच कॅश काउंटर सुरु असल्याने बँकेचे कामकाज सकाळी सुरु झाल्यापासून दुपारी बंद होईपर्यंत ग्राहकांच्या रांगा पाहावयास मिळत आहे. या बँकेतील कर्ज वितरण ठप्प आहे. या शाखेत अनेक महिन्यांपासून बँकेचे पासबुक उपलब्ध नव्हते.

आर्थिक भुर्दंड

बँकेतील काम वेळेत होत नसल्याने बँक सेवक आणि ग्राहकांचे वारंवार वाद होतात तर अपुरा स्टाफ असल्याने बँकेतील अधिकारी ग्राहक सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला ग्राहकांना देतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com