बँक कर्मचारी पुन्हा बंदचे हत्यार उपसणार? 'या' तारखेपासून आंदोलन करणार

बँक कर्मचारी पुन्हा बंदचे हत्यार उपसणार? 'या' तारखेपासून आंदोलन करणार

नाशिक | प्रतिनिधी

बँक कर्मचाऱ्यांचा संंताप पुन्हा अनावर झाला असुन नोकरी भरती करावी या मागणीसाठी त्यांनी एक ऑक्टोेंबर पासुन आंंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून बँक कर्मचाऱ्यांचे केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी विविध कारणावरुन खटके उडत आहे. कर्मचारी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी वारंवार बंदचे हत्यार उपसत आहे. केंद्र सरकार आणि बँक संघटनेत संवाद होत नाही? संघटनांच्या मागण्या सरकारला पटत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या वर्षा अखेरीस व नवीन वर्षांत बंदची हाक दिली आहे.

ऑल इंडिया बँक एप्लाईज युनियन या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मागण्या मान्य न झाल्यास बंदची हाक दिली आहे. डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान हा बंद असेल. कर्मचारी १३ दिवसांचा बंद करणार आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यात विविध बँकेतील कर्मचारी या संपात सहभागी होत आहे. १९ आणि २० जानेवारी रोजी संपूर्ण देशात भारतीय बँका दोन दिवसांचा संप करुन केंद्र सरकारचे लक्ष वेधतील.

कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. थेट भरती करण्याऐवजी आऊटसोर्सिंगवर भर देण्यात येत असल्याने कर्मचारी नाराज आहेत. नियमीत कर्मचारी भरती करण्यावर भर देण्याची मागणी करण्यात आली आहे.

एआयबीईएचे नेते देवीदास तळजापुरकर यांनी याविषयी पत्रक काढले आहे. ग्राहकांची संख्या वाढली आहे. तर कर्मचार्‍यांची संख्या कमी झाली आहे. निवृत्ती, पदोन्नती, कर्मचार्‍यांचे निधन यामुळे अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे अद्यापही भरण्यात आलेली नाही. कामकाजाचा ताण वाढलेला असतानाही कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. त्याविरोधात संपाची हाक देण्यात आली आहे.असे त्यांनी म्हटले आहे.

भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचारी संघटना नाराज आहेत. एकाच व्यक्तीवर कामाचा ताण वाढत आहे. त्याच्यावर अनेक कामांचा भार एकाचवेळी पडतो. कर्मचारी कामाचा हा बोजा किती दिवस सहन करणार असा प्रश्न आहे. त्यामुळे कायमस्वरुपी पदभरती करणे आवश्यक असल्याचे संघटनंचे नेते मनोज जाधव यांंनी म्हटले आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com