
कसबे सुकेणे । वार्ताहर | Kasbe Sukene
मौजे सुकेणे (sukene) अंगणवाडीची (Anganwadi) डिजिटलकडे (digital) वाटचाल सुरू झाली असून येथील अंगणवाडीला ग्रामपंचायतीच्या (gram panchayat) माध्यमातून 15 व्या वित्त आयोगातून (Finance Commission) अंगणवाडीची रंगरंगोटी करण्यात आली आहे.
अंगणवाडीच्या समोरच्या भिंतीवर चक्क महामंडळाच्या बसचे (bus) चित्र काढण्यात आले असून या बसच्या चित्रामुळे अंगणवाडी (Anganwadi) आकर्षक दिसत आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना (students) खेळण्यासाठी खेळ साहित्य व अध्यापनासाठी भिंतीवरती रंगवलेले अभ्यासक्रम याबरोबरच डिजिटलच्या युगात अंगणवाडीला ही संगणीकृत (computerized) करण्याचा ग्रामपालिकेचा असलेला मानस या सर्व गोष्टींमुळे मौजे सुकेणे अंगणवाडीचे रुपडेच पालटलेले दिसत आहे.
ग्रामपालिकेच्या माध्यमातून अंगणवाडीच्या बालगोपालांसाठी बसविलेले खेळ साहित्य हे बाल गोपालांचे प्रमुख आकर्षण असून या खेळ साहित्यामध्ये घसरगुंडी, वजन काटा व झोका हे मुलांचे आवडते खेळाचे साहित्य (Play materials) बसवल्याने अंगणवाडीच्या बालगोपालांच्या चेहर्यावरचा आनंद वेगळाच भाव सांगून जात असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक लहान गोपालांबरोबरच शालेय विद्यार्थी (stidents) देखील या खेळ साहित्याचा आनंद लुटतांना दिसत आहे.
शाळा भरण्याच्या अगोदर, मधल्या सुट्टीत व शाळा सुटल्यानंतरही सायंकाळच्या कालावधीत मुलांचे खेळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ग्रामीण भागामध्ये विनाकारण मोबाईल (mobile) मध्ये लहान मुलांचा गेम खेळण्याकडे असलेला कल या खेळणीच्या माध्यमातून कमी होताना दिसत आहे. ग्रामपालिकेने येथे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला देखील 41 इंची टीव्ही दिल्याने अभ्यास व अभ्यासपूर्वक कार्यक्रमांचा आनंदही येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात घेण्यास मदत मिळत आहे.
विशेषता अंगणवाडी कडे मौजे सुकेणे ग्रामपालिकेचे विशेष लक्ष असून सद्यस्थितीत या अंगणवाडीमध्ये जवळपास 53 विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमती. आहेर, श्रीमती.गाडेकर या परिश्रम घेतांना दिसत आहे.