इंग्रजी अ‍ॅप हाताळण्याची अडचण; अंगणवाडी सेविकांकडून मोबाईल जमा

इंग्रजी अ‍ॅप हाताळण्याची अडचण; अंगणवाडी सेविकांकडून मोबाईल जमा

सटाणा | Satana

शासनाकडून देण्यात आलेल्या मोबाईल फोनमधील अ‍ॅप (App) इंग्रजीत (English) असल्यामुळे वापर करण्यात असमर्थ असल्याचे बागलाण तालुक्यातील (Baglan taluka) अंगणवाडी सेविकांतर्फे (Anganwadi workers) स्पष्ट करण्यात आले आहे...

अंगणवाडी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने येथील महिला बाल विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी मनोज जाधव (Manoj Jadhav) यांच्याकडे सर्व मोबाईल जमा करण्यात आले.

शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाकडून बागलाण तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल फोन देण्यात आले होते. या फोनमध्ये असलेले अ‍ॅप इंग्रजीत असल्याने बहुतांश महिलांना हाताळता येत नसल्याची तक्रार संघटनेकडे तालुकाध्यक्षा रजनी कुलकर्णी, सदस्या कुसुम खैरनार, शालीनी मोरे या अंगणवाडी सेविकांनी केली आहे.

केंद्र सरकारने (Central Government) डिजिटल इंडियाची (Digital India) संकल्पना अमलात आणली आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील (Rural Areas) अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन काम करण्यासाठी मोबाईल फोन देण्यात आले.

याद्वारे सेविका अंगणवाडीत दाखल बालकांची जन्म तारीख, हजेरी, आहार वाटप व लसीकरण आदी सर्व माहिती संकलित करण्यासाठी अ‍ॅप इंग्रजीत असल्याने सेविकांना हाताळता येत नसल्याने येथील बालविकास प्रकल्प कार्यालयात सर्व मोबाईल फोन प्रकल्प अधिकारी मनोज जाधव यांच्याकडे जमा करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र कृती समितीच्या अध्यक्षा रजनी कुलकर्णी, सदस्या कुसुम खैरणार, शालीनी मोरे, गटप्रवर्तक सुनंदा नंदन, मनिषा कापडणीस, रुपाली खरे, अंजना गांगुर्डे, प्रतिभा सावंत, लता देवरे, जयश्री भामरे, जिजाबाई जाधव, मिना गावित, माया भामरे, अनुराधा पाटील, प्रमिला देवरे, इंदू बोरसे, सुनंदा जाधव, संगीता बोरसे आदिंसह महिलांची उपस्थिती होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com