अंगणवाडी सेविका-मदतनीस भरतीस हिरवा कंदील; महिला व बालकल्याण सभापती आहेर

अंगणवाडी सेविका-मदतनीस भरतीस हिरवा कंदील; महिला व बालकल्याण सभापती आहेर

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्हा परिषद अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या भरतीस राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे. लवकरच त्याबाबत नियोजन करावे, असे आदेश जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी दिले.

महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती अश्विनी अनिलकुमार आहेर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. ८) आयोजित केली होती.

त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस समिती सदस्य कविता भाऊसाहेब धाकराव, रेखा यशवंत पवार, सुनिता संजय सानप, गितांजली अर्जुन पवार - गोळे, कमल भाऊसाहेब आहेर, शोभा दिपक बरके, तसेच उप-मुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) दिपक चाटे व बालविकास अधिकारी आदी उपस्थित होते.

जागतिक महिला दिन असल्याने समिती सभापती व महिला सदस्यांचा उप-मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक चाटे यांनी पुष्पगुच्छ देवुन शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे महिला बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, परिचर यांचा सभापती अश्विनी आहेर यांनी सत्कार केला.

सभापती आहेर यांनी सांगितले की, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीमार्फत आदिवासी विभागातील अंगणवाडी केंद्रांना नविन इमारती बांधकामासाठी रुपये १० कोटी निधी मंजुर असल्याने आदिवासी भागातील १५९ अंगणवाडी केंद्राना व बिगर आदिवासी क्षेत्रासाटी ३ कोटी निधीमधुन ६६ अंगणवाडी केंद्राना नविन अंगणवाडी इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. बांधकाम विभागाने तात्काळ निविदा प्रक्रिया राबवुन अंगणवाडी इमारतीचे बांधकामे तातडीने पुर्ण करावेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com