
कळवण । सुशिल कुवर
कळवण तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाअंतर्गत रिक्त असणाऱ्या अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया होणार असून पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
या पदासाठीची अर्ज करतांना किमान शैक्षणिक पात्रता उमेदवार बारावी उत्तीर्ण असलेला असावा उमेदवाराचे वय १८ ते ३५ वर्षादरम्यान असावे. विधवा महिलांसाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्ष राहणार आहे. उमेदवार हा त्याच महसुली गावचा रहिवासी असावा. इच्छुक व पात्र गरजू महिला उमेदवारांनी अर्ज व कागदपत्रे १२ जुलैपर्यन्त कार्यालयीन दिवशी ६ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.
कळवण तालुक्यातील या गावांना होणार अंगणवाडी मदतनीसांची भरती...
नाळीद १, काठरे दिगर, शिंदीपाडा, निमपाडा, पाटीलपाडा, गढीपाडा, हनुमंतमाळ, तिऱ्हळ खुर्द, आमदर, वरखेडा, पळसदर, अंबापुर, सुकापुर, मोहमुख१, विरशेत, जामले हा, धनोली, बापखेडा या १९ अंगणवाडी केंद्रातील रिक्त मदतनीस या पदासाठी भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे.