अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रकल्प कार्यालवर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रकल्प कार्यालवर मोर्चा

देवळा | प्रतिनिधी Deola

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी सेविका( Aanganvadi Workers),मदतनीस यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी देवळा येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयावर संघटनेच्या तालुका अध्यक्षा जिजाबाई अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला .

या मोर्चात तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात पोषण ट्रॅकर सकती करू नये,पोषण ट्रॅकर मध्ये इंग्लीश माहीती भरताना त्रास सहन करावा लागतो,पोषण ट्रॅकर अँप मराठीत करावा व मोबाइल उत्कृष्ट दर्जाचे मिळावेत .,वयक्तीक मोबाईल मध्ये माहीती भरण्याची सक्ती करू नये.आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

यावेळी बालविकास प्रक्लप अधिकारी जयश्री नाईक यांच्या वतीने मुख्य सेविका शकुंतला पवार यांना निवेदन सादर करण्यात आले . याप्रसंगी उषा आहेर ,मंगला सावन्त ,सरला खैरणार ,अलका जाधव ,शोभा जाधव ,सुनंदा निकम ,जया पवार ,शोभा देवरे ,वैशाली अहिरराव आदी सेविका व मदतनीस उपस्थित होते .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com