अंगणवाडी केंद्र इमारत निकृष्ट; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

अंगणवाडी केंद्र इमारत निकृष्ट; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

हरसूल । पोपट महाले | Harsul

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) दुर्लक्षित चिंचओहळ ग्रामपंचायतीच्या अंतर्गत डोळओहोळ पाड्यात नव्याने बांधण्यात आलेल्या

अंगणवाडी केंद्र (Anganwadi Centre) इमारतीचे बांधकाम निकृष्ठ (Poor construction of the building) दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दक्षता व गुणनियंत्र विभागाने (Vigilance and Quality Control Division) प्रत्यक्ष पहाणी करून दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलन (agitation) करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

डोळओहोळ येथे यावर्षी नवीन अंगणवाडी केंद्र (Anganwadi Centre) इमारत बांधण्यात आले आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आलेली इमारत गळायला लागली आहे. विशेष म्हणजे या इमारतीच्या एका भिंतीला शाळेच्या (school) भिंतीचा आधार दिला आहे.यामुळे वर्गाच्या छप्परावर साचणारे पावसाचे पाणी अंगणवाडी इमारतीच्या भिंतीत पूर्णतः घुसले आहे. जणू या अंगणवाडी केंद्राला शाळेच्या एका भिंतीचा आधार दिल्याने अंगणवाडी इमारत बनविण्यासाठी तीन भिंतीचे अंदाजपत्रक मजूर करण्यात आले का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

येथील पाड्यात साठ लाभार्थी असून नवीन इमारतीत स्वप्न पाहणार्‍या लाभार्थ्यांना दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून (Vigilance and Quality Control Division) दिलासा मिळेल काय? बांधण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राच्या प्रवेश दाराजवळ धोकादायक स्थितीत संरक्षक उपाययोजना करण्यात येतील काय?शौचालय खड्डा आणि इमारतीच्या स्वयंपाक गृहातील अंधार दूर होईल का असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.मात्र या सार्‍या गोष्टीना ग्रामसेवक उत्तम पांडुरंग केदारे यांनी दुजोरा दिला आहे.

जुलै (दि.19) रोजी ग्रामसेवक उत्तम केदारे यांनी अंगणवाडी केंद्राच्या अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) मंगल राथड यांना पत्रव्यवहार करत नवीन बांधकाम केलेल्या अंगणवाडी इमारतीत स्थलांतर व्हावे असे सूचित केले आहे. मात्र ग्रामस्थांनी अंगणवाडी केंद्र इमारतीचे बांधकाम निकृष्ठ (Poor construction of the building) दर्जाचे झाले असल्याचा आरोप केला असून आंदोलन (agitation) करण्याचा इशारा दिला आहे.

तसेच ग्रामसेवक पाड्यात कधी फिरकत नसून मनमानी कारभार करत असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी भास्कर भसरे, अंगणवाडी सेविका मंगल राथड, मदतनीस जनाबाई भसरे, धोंडीराम भसरे, यशवंत राथड, मीराबाई भोये, फुलाबाई भसरे, मीरा काळू भसरे, जनाबाई भसरे, मनीबाई पवार, गोविंद पवार, वेणू बांगड, दशरथ भसरे, विजय भसरे, अंबादास राथड, भगवान भसरे, कृष्णा भसरे, विजय भसरे, तुकाराम भसरे, महेंद्र भसरे, सावळीराम भसरे, सुगंधा राबडे, जनाबाई भसरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थी अजूनही अडाणीच

या पाड्यात जिल्हा परिषदेची चौथी पर्यन्त शाळा असून विद्यार्थी पटसंख्या 12 असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.द्विशिक्षकी आणि एकाच वर्गात भरणार्‍या शाळेत कोणता विद्यार्थी कितवीत शिकत आहे हे ग्रामस्थांना उमजत नाही.अनेक विद्यार्थ्याना ग्रामस्थांनी पाडे विचारले असता उत्तर देता आले नसल्याने शिक्षक तरी करतात काय? गुणाकार, भागाकार आणि साधी बेरीज येत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केल्याने येथील विद्यार्थ्यांचे शिक्षण अडाणी पणाचे असल्याचे समजते.तसेच शिक्षकांना वेळोवेळी ग्रामस्थांनी सूचित करूनही वेळेचे कुठलेही बंधन नसल्याचे ग्रामस्थांनी आवर्जून सांगितले.वरिष्ठांनी लक्ष घालण्याची अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत.

अशुद्ध पाणी

डोळओहोळ पाड्यात अनेक समस्या आहेत. त्यात वाहणार्‍या वाघ देव नदी प्रवाहाच्या हाकेच्या अंतरावर पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. मात्र या विहिरीचे पाणी अतिशय अशुद्ध असल्याने पिण्याजोग नाही. पाण्यापेक्षा या विहिरीच्या संरक्षक जाळीवर लाखाच्या आसपास खर्च करण्यात आला आहे.या विहिरीवर जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.करण्यात आलेल्या पायर्‍यावर शेवाळ चढल्याने महिलांना जीव मुठीत धरून पाणी आणावे लागत आहे.

अंगणवाडी केंद्राची इमारत केवळ तीनच भिंतीवर बांधली आहे.एका भिंतीला शाळेच्या भिंतीचा आधार घेतला आहे.तसेच सद्यस्थितीत अंगणवाडी गळत आहे. शौचालय खड्डा अपूर्ण अवस्थेत आहे. अंगणवाडी केंद्र सुरू होण्याआधीच ही दुर्दशा आहे. दक्षता आणि गुणनियंत्र विभागाने सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी.

- भास्कर भसरे, ग्रामस्थ डोळओहोळ

गेल्या दहा वर्षांपासून अंगणवाडी केंद्राअभावी घराच्या ओट्यावर अंगणवाडी केंद्र सुरू होते.यावर्षी अंगणवाडीला नवीन इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत ताब्यात घेण्यासाठी ग्रामसेवकांनी पत्रव्यवहार केला आहे.मात्र सद्यस्थितीत बांधण्यात आलेली इमारत धोकादायक आणि गळक्या अवस्थेत आहे.पायर्‍याअभावी लाभार्थ्यांसाठी धोकादायक आणि अपघात घडवणारी आहे.यामुळे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ताब्यात घेतलेली नाही.

- मंगल राथड, अंगणवाडी सेविका, डोळओहोळ

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com