आंध्र विरूद्ध महाराष्ट्र क्रिकेट सामना अनिर्णित

आंध्र विरूद्ध महाराष्ट्र क्रिकेट सामना अनिर्णित

नाशिकच्या ईश्वरीची धडाकेबाज खेळी

 नाशिक | Nashik

१९ वर्षांखालील (Under -19) महिलांसाठी राज्यस्तरीय ५० षटकांची सामन्यांच्या एकदिवसीय स्पर्धेत (One day competitions) महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे (Maharashtra cricket team) नाशिकच्या (Nashik) ईश्वरी सावकार (Ishwari Savkar) हीने आंध्र (Andhra Pradesh) विरूद्ध जोरदार फलंदाजीचे (Batting) प्रदर्शन केले. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India), बीसीसीआय (BCCI) तर्फे 19 वर्षांखालील महिलांसाठी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर 2021 दरम्यान सुरत येथे खेळविली जात आहे.

सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी ने ११८ चेंडूत धडाकेबाज ८६ धावा केल्या. धावबाद झाल्याने तिचे शतक १४ धावांनी हुकले. प्रथम फलंदाजी करताना नाशिकच्याच साक्षी कानडी बरोबर १ बाद ३ वरुन केवळ साधारण ७ षटकांत, तिने ४० धावांची जोरदार भागीदारी केली. साक्षी ने १३ धावा केल्या. नाशिकची तिसरी खेळाडु रसिका शिंदे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीत आली असतानाच पावसामुळे ३८ षटकांत ४ बाद १७७ धावांवर च सामना थांबवावा लागला.

पावसामुळे अनिर्णीत राहिलेल्या ह्या सामन्याचे प्रत्येकी २ गुण महाराष्ट्र (Maharashtra) व आंध्र ला मिळाले. महाराष्ट्र संघाचा समावेश एलिट डी गटात असुन चंदिगड संघाबरोबर ४ ऑक्टोबर चा सामना होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com