
संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner
रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात बाहेर पडलेला बिबट्या (Leopard) कोंबडी (Chicken) पकडण्यासाठी खुराड्यात शिरला.
मात्र, या खुराड्यात बिबट्या स्वतःच अडकून पडल्याची घटना संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) सारोळे पठार भागात घडली. सध्या थंडीचे (cold) दिवस असल्याने बिबटे भक्ष्याच्या शोधात फिरत असतात. पठार भागात (Plateau area) सध्या बिबट्यांचा (Leopard) वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीच वातावरण आहे. असाच एक बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना खुराड्यात अडकला. शेतकरी (farmer) घन:श्याम भागाजी फटांगरे यांच्या वस्तीवरील शेतात कोंबड्या ठेवण्यासाठी लोखंडी जाळीचे (Iron mesh) खुराडे असून यात त्यांनी कोंबड्या ठेवल्या होत्या.
रात्री भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याला (Leopard) खुराड्यात कोंबड्या दिसल्याने तो कोंबड्यावर ताव मारण्यासाठी त्या खुरड्यात शिरला आणि स्वतःच अडकून बसला. हा बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकल्याचे वनविभागाला (Forest Department) समजल्यानंतर वनाधिकारी चैतन्य कासार यांनी आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याला कोंबड्यांच्या खुराड्यातून बाहेर काढत वनविभागाच्या पिंजर्यात बंद केल्यानंतर शेतकर्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.