नाशिक । प्रतिनिधी Nashik

आनंदवली येथे झालेल्या वृध्दाचा खून शेतीच्या वदातून झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी भाजपच्या माजी पदाधिकार्यासह 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पैकी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यात एका महिलेचा सामावेश आहे.

रम्मी राजपुत, सचिन त्रंबक मंडलिक, जगदिश त्रंबक मंडलीक , अक्षय जयराम मंडलिक, मुक्ता एकनाथ मोटकरी, भुषण भिमराज मोटकरी, सोमनाथ काशिनाथ मंडलिक, दत्तात्रय काशिनाथ मंडलिक, नितीन खैरे, आबासाहेब पाराजी भडांगे, भगवान चांगले अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि.17) आनंदवल्ली येथील रमेश वाळु मंडलिक (70) यांचा आनंदवली येथे गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सायंकाळी भर दिवसा साडेपाच वाजेच्या सुमारास घडली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दिपाली खन्ना, गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. अंचल मुदगल हे पथकासह तेथे दाखल झाले होते.

पोलीसांनी तातडीने याबाबत सुत्र फिरवून माहिती घेतली असता हा खून शेतीच्या कारणावरून भावकितील वादातून झाल्याचे समोर आले. पोलीसांनी तात्काळ चक्र फिरवत 9 संशयितांना अटक केली आहे. रम्मी राजपूत व जगदिश मंडलीक यांचा पोलीस शोध घेत आहेत. 9 संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता सर्वांना 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.