तालुक्यात अद्ययावत अभ्यासिका उभाराव्यात : वाजे

तालुक्यात अद्ययावत अभ्यासिका उभाराव्यात : वाजे

मनेगाव । वार्ताहर | Manegaon

सिन्नर तालुका (sinnar taluka) हा अधिकार्‍यांचा तालुका व्हावा यासाठी अभ्यासिकांची (library) संकल्पना पुढे येत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावांत अद्ययावत अभ्यासिका उभी राहणे आवश्यक असल्याची भावना माजी आमदार राजाभाऊ वाजे (Former MLA Rajabhau Waje) यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील पाटोळे (patole) येथे बांधण्यात आलेल्या गोपीनाथ मुंढे सामाजिक सभागृह (Gopinath Mundhe Social Hall) व छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅकचा (Chhatrapati Shivaji Maharaj jogging track) लोकार्पण सोहळा नुकताच त्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उदय सांगळे, रविंद्र खताळे, सहाय्यक निबंधक राजेंद्र आव्हाड, रामनाथ पावसे, सरपंच संगिता आव्हाड, उपसरपंच देविदास कराड, माजी सरपंच मेघराज आव्हाड प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

शारीरीक आणि बौध्दिक विकास (Physical and intellectual development) तरुणांमधे (youth) घडवण्याच्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी पाटोळे गावात झाल्याचा आनंद होत आहे. पाटोळेत प्रशासकीय अधिकारी घडत आहेत. त्यांचा आदर्श ठेवत तरुण अलीकडे अभ्यासिकांची मागणी करत आहेत. भविष्यात अधिकार्‍यांचा तालुका म्हणुन तालुक्याची सर्वत्र ओळख निर्माण होणार असल्याचे मत राजाभाऊ यांनी मांडले.

सांगळे यांनी येथील विकास कामांचे कौतुक करत पुढील काळातही सर्वांनी गट-तट विसरुन गावाचा विकास करण्याचे आवाहन केले. बाळासाहेब कराड यांनी प्रास्ताविक केले. मेघराज आव्हाड यांनी मेघदुत फाऊंडेशन स्थापन केल्याचे सांगत सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जिजा खताळे, गितांजली कराड, मोहिनी खताळे, मनीषा खताळे, मनोहर चकोर, सुनिल सांगळे, भाऊपाटील खताळे, माजी सरपंच सोपान खताळे, नंदु खताळे, ग्रामसेवक वाय. डी. पाबळ, योगेश बैरागी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.