धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी- कसारा दरम्यान ( Igatpuri-Kasara ) धावत्या रेल्वेतुन (Railway) पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यु झाला असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस (Railway Police)हवालदार हेमंत घरटे यांनी दिली.

कसारा घाटातील रेल्वे क्षेत्रातील कि. मी. नंबर १२३/१८ येथे एक तरूण जखमी अवस्थेत आढळुन आल्याने रक्सौल एक्सप्रेसचे गार्ड ए. के. वर्मा यांनी कसारा घाटातुन पुढील उपचारासाठी इगतपुरी रेल्वे स्थानकावर आणले. रेल्वे स्थानकातुन या जखमी तरुणाला लोहमार्ग पोलीसांनी इगतपुरी रेल्वे हॉस्पीटल येथे आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासुन मृत घोषीत केले.

सदर मयत तरुणाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष, अंगाणे सडपातळ, उंची ५ फुट, डोक्याचे केस काळे, उजव्या हातावर अस्पष्ट गोंदण, चेहरा उभट, मानेखाली तीळ, अंगात काळी जीन्स, सफेद काळ्या रंगाचा डीझाईन असलेला शर्ट घातलेला असुन या मयत तरुणाची ओळख पटली नसल्याने या तरुणा बाबत कोणाला काही माहिती असल्यास लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन वरीष्ठ पोलीस हवालदार हेमंत घरटे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com